दुखण्याचा -काळ
दुखण्याचा -काळ
असे म्हणतात की वेळ आली की काळ ही येतो ....
दुष्काळ मात्र परत परत येतो ...
एखाद्या असाध्य रोगाप्रमाणे तो जडतो ....
त्याला बघून शेतकरी मात्र डोक्यावर हात ठेवून बसतो .....
भविष्याचा चिंतेत तो मनाने मरतो ....
पावसाच्या सारख्या वैद्याच्या येण्याकडे डोळे लावून बसतो ...
आपल्या परीने देवाला साकडे घालतो ...
काय अवस्था होते त्या जमिनीची
म्हतारपणी सुरुकुत्या पडलेल्या चेहरासारखी ..
भेगा बघून अंगावर काटा येतो ....
दुखत असेल का तिला खूप हा प्रश्न पडतो ...
रोगाने ग्रासलेले तिचे ते शरीर ...
कोरडी पडलेली तीची ती त्वचा ...
पाण्यासाठी तळमळत असलेला तिचा जीव ....
तिची अशी अवस्था बघून शेतकरी ढासळतो ....
तुच्या उपचार साठी आपल्याकडे पैसे नाहीत एवढे म्हणून आपला जीव गमावतो ....
ह्या असाध्य रोगाचे परिणाम आहेत खूप गंभीर ...
उपचार करेल का कोण कधीतरी होऊन जरा गंभीर ...
कधी होणार ह्या रोगाच पक्के असे निदान ...
मोकळा असा श्वास कधी जमीन घेणार ...
