दुधाळ गाढवी जरी जाली पाहे
दुधाळ गाढवी जरी जाली पाहे
दुधाळ गाढवी जरी जाली पाहे ।
पावेल ते काय धेनुसरी ॥१॥
कागाचिया गळा पुष्पाचिया माळा ।
हंसाची तो कळा काय जाणे ॥ध्रु.॥
मर्कटें अंघोळी लावियेले टिळे ।
ब्राह्मणाचे लीळे वर्तूं नेणे ॥२॥
जरी तो ब्राह्मण जाला कर्मभ्रष्ट ।
तुका म्हणे श्रेष्ठ तिहीं लोकीं ॥३॥
