दत्त दिगंबर दैवत माझे...
दत्त दिगंबर दैवत माझे...
दत्त म्हणजे काय....
नीट ऐका हो जण...
स्वतःच्या ठायी असणारा आनंद
देण्यासाठी निर्गुण निराकार परमेश्वर
सगुण स्वरूपात साकार झाला
सर्वकाही देणारा तो दत्त झाला
विश्वरूपात जो समोर उभा ठाकला
शरीर रूपाने जो जवळी लाभला
सच्चिदानंद रूपाने प्रत्येकाच्या
अंत:करणात हो साठला
शरीर रूपाने साकारून
अवतीर्ण हो झाले...
शरीर रुपी दिसून परी मन अन
चैतन्य(ईश्वर) रूपाने गुप्त हो झाले
याचेची प्रतीक दत्त साकारले
तीन शिरे शरीर,मन,चैतन्य(ईश्वर)
सहा हात-शरीराचे दोन डावे उजवे हो
दोन मनाचे अंतर्मन अन बहीर्मन हो
दोन चैतन्याचे जाणिव अन नेणीव हो
मागे कामधेनू अधिष्ठान चैतन्य शक्ती
पुढ्यात श्वान म्हणजे श्वास ज्यामुळे जीवन
हाती त्रिशूळ म्हणजे हातात काम
मुखाने जपावे सदा नाम
अंत:करणी असावे सदैव राम
काखेत हो झोळी
बाई माझी झोपडी चंद्रमोळी
जेथूनिया मिळेल तेथूनिया
सतत मिळवावे ज्ञान कायम
दत्त म्हणजे आपण ज्ञान मिळवावे
ज्ञान देतो तो हो गुरू
अन् देतो तो देव हो
सद्गुरूने दिलेल्या ज्ञान
आपणच दत्त होणे म्हणजे
ओम गुरुदेव दत्त....
