दसरा..!
दसरा..!
दसरा सांगे सारे विसरा
भरून काढा आता घसारा
आवरा सारा फालतू पसारा
मोकळ्या श्वासाचा सोडण्या सुस्कारा
झाले गेले गंगेस मिळाले
पापांचे आता क्षालन झाले
पुण्यासाठी पुन्हा एकदा
नशिबाने पहा दार उघडले
शुभ मुहूर्तावर आता करू सुरुवात
नव्या मार्गाने जीवन जगण्यास
आनंदी आनंद उपभोगण्यास
अन जीवन कृथार्थ करण्यास...!!
