दर्यावर्दी खलाशी
दर्यावर्दी खलाशी
दर्यावर्दी मी खलाशी , बेदरकार जगतो
लाटांच्या तांडवावरी , सुखेनैव विहरतो (१)
वारा , वादळ असती , आमुचे सखेसोबती
मासे पाणवनस्पती , नाखव्यात डुलती (२)
मला न माहित कधी , दिशा वा-याची बदले
त्याच्यासवे स्वप्ने माझी , समिंदर उलगडे (३)
*येता*सागरभरती*मी* *दर्यावर्दी*पट्टीचा*
दर्यासंगे झुलताना , लवलेश ना भितीचा (४)
रोज किनारा खुणवी , सफर मला पुढची
सागरातल्या जीवनी , मज आस क्षितिजाची (५)
साहसामधेच जीवन , थरारक वाटतसे
दीपस्तंभ माझ्यासाठी , मार्गदर्शकचि आहे (६)
