दर्पणात मी
दर्पणात मी
दर्पणात मी
निरखली छबी
स्वर्गीची रंभा
ठसक्यात उभी
नव्याने पाहता
या दर्पणात मी
मुसमुसलेली
यौवनातच मी
कुरळे कुंतल
बटा रेंगाळल्या
सुंदर दंतपंक्ती
या लकाकल्या
कमनीय बांधा
मधुबाला परी
मी न ओळखु
की स्वर्गीची परी
रूपाची मदनिका
अदा प्रणयरम्य
साऱ्यांना ते वेड
सौंदर्याचेच गम्य
