STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Classics

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Classics

#दिवाळी

#दिवाळी

1 min
305

अरे सणामधी सण, सण दिवाळीचा मोठा

पाच दिसांचा उत्सव,नाही आनंदाला तोटा


सडा सम्मार्जन करुनी, बांधीले तोरण दारी

रांगोळी ती अंगणीची नवा उत्साह हो भरी


आरास दिव्यांची बघून, मन माझे सुखावलं

शोभा घराची वाढवे, सुंदर आकाशकंदील


समृद्धी, लक्षुमीच्या,पूजनाचा सण दिवाळी

गृहलक्ष्मी घरची बघा, गाय गोधन ओवाळी


पंचपक्वान्नाचे ताट,नव्या वस्त्रांचा हो थाट

दर्शन ते ऐश्वर्याचे,असे आनंदाची लयलूट


धन्वंतरी पूजन येथे, नरकासुराचे ते मर्दन

दातृत्वाचे बळीराजाच्या,लोक करिती कथन


भाऊबीज दिन आहे बहीण भावाच्या प्रेमाचा

साक्ष देतो तयाची,चंद्र बीज आकाशीचा


असा दिवाळीचा सण,येई आनंदा उधाण

परी परदुःखाचेही थोडे ठेवा तुम्ही भान


आनंद वाटतांना , ठेवा वंचीतांची आठवण

उजळाया अंतर्मन ,आहे दिवाळीचा सण


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics