दिवाळी फराळ
दिवाळी फराळ
सण येता दिवाळीचा
काय बाई होते घाई
करू करंज्या आधी
की लाडू वळू काही
आणला एकदाचा किराणा
आता निवडसावड सुरू
बारीक सारीक आवरले
की फराळाचे काम करू
चटपटीत चकल्या गोल
शंकरपाळे गोड गोड
चिवडा सोबत झणझणीत
बेत झाला गोडधोड
मठरी माझ्या आवडीची
टमटम फुगले गुलाबजाम
झाल्या चकल्या खमंग छान
फराळ आवडला सर्वांना जाम
