समृद्ध कोकण
समृद्ध कोकण
1 min
236
नटल बाई सजल बाई
कोकणात मजा लई
चला चला लवकर मला
झाली खूपच घाई
कोकणात हिरवळ
दाट करवंदाची जाळी
सागर जळी तंरगे
पाण्यावर मासोळी
कौलारू घरात
मांडांच्या झाडात
कोकण आमच
छान आहे लाखात
कोकणात अंबा
गोड फणसाचे गरे
येथील मानसे लई
मायाळू अन् खरे
समृद्ध कोकणात
काजूची झाडे
रानमेवा इथल्या
जंगलात दडे
