STORYMIRROR

Anusaya Udamale

Others

3  

Anusaya Udamale

Others

शुभसकाळ

शुभसकाळ

1 min
337

उधळले रविकिरणे चहूकडे

पसरले लालभडक तांबडे

जागी झाली ढोर जनावरे

अरवले भल्या पहाटे कोंबडे


जाग आली दाही दिशांना

मंदीरी मंजुळ वाजे भूपाळी

जन हे जागले कामालागले

गुरू ज्ञान हे प्रसाद सकाळी


लगबग झाली माऊलीची

मारी हाका उठ रे बबड्या

संवगडी बघ दारी जमले 

शाळे साठी घेऊन पाट्या


न्याहारी चा खंमग दरवळ

स्वयंपाकी झुनकाभाकर

धारा काढल्या गायी म्हशींच्या

शेतानिघाले घरधनी,चाकर


साहित्याला गुण द्या
लॉग इन