आठवणीतील क्षण
आठवणीतील क्षण
तस मानल तर आपल
नात जुन आहे
अन् अनुभवल
तर नव आहे
कसा केला प्रवास सोबत ?
हे न उलगडलेल कोडच आहे....
रोज जसे सोबत असतो
हे मनाच गोड गुपीत आहे
नियतीचा गाडा ओढायचा
घातला नियम पाळायचा
थकल्यावर मात्र खांदा
तुझाच शोधायचा....
लागलेल वळन काही
क्षणात जात नाही
तुझी लागली सवय
आता मोडता मोडत नाही.....।
आतून एक हाक आली
का ...का...अस वागाव..।
कुणी आल म्हणून आपण
का दुर निघून जाव...।
हो आहोतच लांब
पण... या शरीरने
मनातील प्रेमाला कोण
बांध घालनार आहे......।
एक वेगळाच अनुभव
आता होत आहे
आठवणीतील क्षण तू
अन् तूच माझा श्वास आहे....

