STORYMIRROR

Anusaya Udamale

Others

3  

Anusaya Udamale

Others

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

1 min
543

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी

जव्हा हाती घेतली लेखणी

ज्ञानसूर्य असा चमकला 

दिले जातिभेदा फेकूनी


जनावरांसारखी दिन

दलितांना वागणूक होती

बाबासाहेब होते म्हणूनी

ती आज माणसात आली


पाणी पिण्यासाठी सुद्धा

नव्हता दलितांना अधिकार

पहिल्यांदाच असे घडले

पाण्यासाठी केला सत्याग्रह


संविधान लिहून त्यांनी

हक्क सर्वांनाची दिले

तव्हा दीनदलितांचे

जगणे सोपे झाले


अभिमान आम्हा भिमाचा

आज त्यामुळेच वाचा

दीनदलितांचा रक्षक

आमच्यासाठी तो देवच.


Rate this content
Log in