रंग
रंग
रंगात रंगुनी
रंग एक झाला
तुझ्या माझ्या नात्याला
नवा रंग आला
रंगली काया नव्हे
रंगले मनेही
राधीकेच्या घरी
जातो पहा श्रीहरी
फुलासवे लाठ्यांची
अनोखीच होळी
आठवण होते दमता
पुरणाची पोळी
रंगुनी शामरंग
राधा होई बावरी
रास होता खेळुनी
कान्हा वाजे बासरी
रंगात रंगुंनी राही
मैत्री , प्रेम बंध
नव्या नात्याचा जाई
दुरवर हा सुगंध
