पाऊस
पाऊस
आजही हा पाऊस
मला तितकाच छळतो
कितीही मागे फिरले
तरी मला घेऊन वळतो
आठवांचा सुगंध
राजसा दरवळतो
गजरा माझ्या वेणी मधला
तु म्हणतसे घमघमतो
मातीचा हा ओला गंध
घेऊन आला तुझीया संग
आज आठवे पावसासवे
प्रेमाचे ते अगणित रंग
तुला पाहण्या आतुरलेले
क्षण आठवे मंतरलेले
चुकतो ठोका काळजातला
तुझीया संगे मी भिजलेले
नजर तुझी थांबली होती
मला एकटक निरखीत होती
तुला पाहुनी सख्या साजणा
थिजले ओठांनवरचे पाणी
आज बिजली नभात नव्हती
अंगी माझ्या ती अवतरली
स्पर्शून घेता तु मज जवळी
सार्या अंगी अशी सळसळली
लाजलाजुनी प्रिया
झाले मी पाणी
पावसाने गुणगुणली
दोघांची मंजूळ गाणी

