STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational Others

3  

Pandit Warade

Inspirational Others

दिस दुःखाचे जातील

दिस दुःखाचे जातील

1 min
262

सारा अंधार संपेल

नवी फुलेल पहाट

सुरू होईल जगाचे

पुन्हा नव्याने रहाट


अशी कशी महामारी

गाडे  जगाचे  थांबले

आज उद्याच्या आशेने

लग्न कुणाचे  लांबले


दहशत  कोरोनाची

ऊरी धडकी भरली

मृत्यू बरा, अशी इथे

त्याची भीती पसरली


भीती मनातून काढू

सुरक्षेच्या अटी पाळू

जगावर आलेले हे

विघ्न विषाणूचे टाळू


सरकार आणि आम्ही

मदतीचा  हात  देऊ

कोरोनाच्या संकटाला

सारे   मिळून  हरवू


मनी आशावाद ठेवू

दिस दुःखाचे जातील

सारे मोकळ्या मनाने

घास सुखाचे खातील


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational