STORYMIRROR

Gajanan Pote

Inspirational

4  

Gajanan Pote

Inspirational

दिलखुलास जगाने

दिलखुलास जगाने

1 min
547

जगावे दिलखुलास बिनधास्त 

सोडून द्यावे नेहमी राहणे चिंताग्रस्त 

विचारांची अडगळ दूर सारवून बघा 

हसा आणि हसवणे शिका 

आनंदी राहण्याची सुरुवात स्वतः पासून करावी 

चिंता जगाची मनी नसावी 

दिलखुलास होवून जगणे शिका 

चुका दुसर्‍यांच्या शोधू नका 

अंतर्मनातील खरे सुख शोधा 

नका आणू कुणाच्या कार्यात बाधा 

दिलखुलास हसावे, वागावे 

दिलखुलास होवून बघावे 

विचारांचा गुंता सोडा 

आयुष्याला वेळ द्या थोडा 

मरणानंतर नसते काही 

विचार न केल्याने बिघडत काही नाही 

विचार चक्र जरा थांबवा 

आनंदी जगण्यासाठी वेळ द्यावा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational