दिले वचन...
दिले वचन...
विसरून गेलो तूला बघ डोळे रडत नाहीत
पाजर फुटणाऱ्या झोतावर, दुःखाचं धरण बांधीत,
प्रेमाचा नवा किनारा उभा केला आहे
तूला दिलेल्या वचनाच समरण आहे.
आता बोलू नको नाटक करतोय,
देवाकडे तुच्यासाठी सुख उधार मागतोय.
जे माझा नशिबात आहे तेही तूला देतोय.
विसरून गेलो तूला बघ डोळे रडत नाहीत
नशिबात नाहीस असं बोलून विषय संपवलास बरा.
याच्या मुळे झाला नवीन खेळ सुरु खरा..
रडत्यास कशाला, माफी नको मागू,जाऊ नको दूर थांब जरा.
तूला वेड लावील एक कोंडी पोरखा प्रेम वारा..
प्रेम मांडतोय
अर्ध तूला देऊन,
बाकीच तुझ्यासाठी ठेवतोय..
विचित्र वेडा तूला, का?रडवतोय.
या दुनियेच्या पुढे एक समुद्र असेल.
कोणाला माहित नाही, आणि शोधू पण नको
तिथे खऱ्या प्रेमाचा मोकळा श्वास असेल
अलगत तिचा हात हृदयावर आला,
बांधून ठेवलेला बंदरा फुटला...
विरून गेलो तूला बघ डोळे रडत आहेत..

