STORYMIRROR

Deepali Mathane

Inspirational

3  

Deepali Mathane

Inspirational

दीप मांगल्य स्वरूप

दीप मांगल्य स्वरूप

1 min
292

दीप मांगल्यस्वरूप

उजळले घरादारात

तिमिराच्या अस्तित्वात

विराजे दीपाची ही मात

  दीपाचा अहेर प्रकाश

   भिनला चरचरात

   तिमिरास थारा नसे

   कधी मनमंदिरात

दीप उजळले मनी

सुखसौख्याची वरात

समृद्धीची हसरी किरणे

तेजाळली संसारात

  लखलख चंदेरी तेज

  झंकारले जीवनात

  तिमिराच्या गर्द छायेस

  सोडूनिया परसात

आशेचे हे दीप उजळो

स्वप्नपूर्तीच्या आकारात

सद्विचारांचे मोती

वाहूनी संस्कारात

   नैराश्याच्या तिमिराला

   जागा न मिळो आयुष्यात

   दीप आशेचा हा जागो

   सदा मनीच्या देव्हाऱ्यात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational