STORYMIRROR

VINAYAK PATIL

Inspirational Others

3  

VINAYAK PATIL

Inspirational Others

ध्येयपूर्ती

ध्येयपूर्ती

1 min
241

स्वप्नांना ना लांबी ना रुंदी 

त्यांना फक्त असते उंची 

ती पूर्ण करण्यासाठी असावी स्फूर्ती 

अन् जिद्द बाळगावी ध्येयपूर्तीची 


पोकळ ध्यास मनी नसावा 

खंबीरपणा अंगी असावा 

अडचणी येतील अनेक 

लढण्याचा ध्यास असावा 


यश मिळो अथवा न मिळो 

न बाळगावी खंत उराशी 

आत्मविश्‍वासाने होवून जागा 

कर दोन हात येणाऱ्या संकटांशी 


स्वाभिमानाने लढ पण खचू नकोस 

येणाऱ्या संकटाला भिऊ नकोस 

घे परमेश्वराचे नाव आणि सुरू कर प्रवास 

जिंकण्याची आस मात्र सोडू नकोस 


आनंदी मनाने सोस कष्ट सारे

कष्टातूनच दिसे उद्याचे नजारे

जगण्याच्या शर्यतीला उभा रहा खरा 

पण जीवन सोडून जाऊ नको ना रे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational