ध्येयासक्ती
ध्येयासक्ती
तू हरु दिल नाहीस
म्हणून हरलेच नाही कधी
धावण्याच इतकं वेड लावलस की
थांबण्याची उसंतच मिळाली नाही कधी
आकडयांचे हे गणित सुटलेच नाही कधी
बुद्धिबळाच्या पटाचा डाव संपलाच नाही कधी
चक्र डोक्यातले फिरणं थांबलेच नाही कधी
चीतपट करण्याची ही हौस भागलीच नाही कधी
