ध्येय वेध ( अभंग रचना )
ध्येय वेध ( अभंग रचना )
ध्येय वेध
यश मिळवण्या | हवी मेहनत I
प्रयत्न करत | सदोदीत ॥ १ ॥
अपयश येता I न जाता खचून I
यश मिळवून I ते थांबावे ॥ २ ॥
प्रयत्न तो एक I निष्फळ जाहला |
भाता पहा केला | रिकामाच ॥ ३ ॥
असावा संयम I चिकाटी ठेवावी I
मगच चाखावी | यशश्री ती ॥ ४ ॥
दृढ ते निश्चय | मनाशी करावे I
मगच साधावे | ध्येय वेध ॥ ५ ॥