ध्यानीमनी
ध्यानीमनी
ध्यानीमनी नव्हते आपलेच
हृदय दगा देईल
आपलेच फुप्फूस
तुडुंब भरेल
आपलीच माणसे
आपल्यापासून दूर जातील
आपले देव बंदिवासात जातील
आपलेच आपल्या पासून दूर होतील
चार खांदे ही दुर्मिळ होतील
अश्रू ढाळणारे ही पाठ फिरवतील
आनंदाचेच काय मृत्यूचे
ही सोहळे बंद होतील
फुलांच्या कोठे ध्यानीमनी असतं
का फुलायचं कुणासाठी
फुलायचं कशासाठी फुलायचं
आपणही काही काळ
आसमंत फुलवावं
कुणाच्या ध्यानीमनी नसतांना.
