STORYMIRROR

Jyoti Nagpurkar

Tragedy

3  

Jyoti Nagpurkar

Tragedy

धरणी माय

धरणी माय

1 min
508

का रूसलीस माय 

काळ्या ढगांनी रोज मुसळी पाऊस पाडुनही

तहान, भागली नाय


उग्र तुझे रूप बघून जीव जिवणीवर होतेय दुष्प्रभाव

गत सर्वांची अर्धमेल्यागत, अंगाची लाही होत भाव 


भरती आली जलाशयात नदी नाल्यात पूर

डोंगर माथ्यावरून वाहती सरी, तरी नाही समाधान 


उड्या मारत रोगराई ह्याच्या त्यांच्या अंगावर

सोसवत नाही त्राण, चिमुकल्याशा मनांवर


समजते, आम्ही लेकरांनी केले अन्याय तुझवर

परीणीती त्याची, दिसतेय आज धारेवर


वाढत्या लोकसंख्येच होतेय तुझ्यावर भार

जाग न येती तरीही या, अती शहाण्या माणसात


विकासाचा बेत आखून , ओरबडुन दिले तुज घाव

वाटले, 

तोडमरोड करुन झाडांची करू जंगल उद्वस्त

स्वार्थानी आंधळे होऊन, मनमानी करू मस्त


तहानतच राहील माझी माय

शहर शहरात सिमेंट रस्ते करुन

काळजी तुझी करण्याची, बुद्धी झालीच नाय

सिमेंटीकरणानी भू माते तुझ्या , अंतरंगी 

पाणी तरी कसं जाय


वागलो आम्ही उर्मट, तुझ्या भावना दुखवत

घातकी जाणुन ही, प्लॅस्टिक वापर करीत 

अंगी, बाणवली शिस्त

माथ्यावर ठेवतोय हात आता

वातावरणात दिसतोय अंत आता

ह्रदयात, होत धास्त


तुझे आशीष दाखवेल 

माणुसकीचं भान

दे, दिलासा आम्हा लेकरास

ठेवु तुझ्या, निष्ठेचा मान ....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy