धरल तर चावतय
धरल तर चावतय
या सोशल मीडियाचा
आता आलाय ऊबग
नकोसं वाटू लागलं
ते आभासी जग
कोणी कोणाला पाहत नाही
कोणी कोणाचं ऐकत नाही
जो तो आपलाच घोड
पुढे पुढे दामटत राही
जबरदस्ती कोणी ऐकवत
आपल्या भाचीचा गळा
एवढ्या बेसूर गाण ऐकून
खळकन येत पाणी डोळा
कोणी कोणी दाखवत
आपला सुगरण पणा
रेसिपी असते नवीन
बाकी मसाला तोच जुना
कोणी पाठवतो कविता
व्हिडिओवर सतराशे साठ
तेच तेच व्हिडिओ पाहून
अक्षरशा: होतात पाठ
सणावाराला तर भीतीच वाटते
सर्वांनाच येत संस्कृतीचे भान
जो तो उठतो मेसेज टाकतो
सर्वांनाच मोकळं रान
15 ऑगस्ट 26 जानेवारीला
यांच देश प्रेम ऊतू जात
बाकीच्या दिवशी अडकतात
धर्मपंथ राज्य आणि जात
व्हाट्सअप वरील डॉक्टर वैद्य
त्यांच्या ज्ञानाला नाही तोड
उकळलेल्या गव्हाला देखिल
आणून दाखवतात मोड
सगळे झाले त्याचे ॲडिक्ट
सगळे पडतात फशी
धरल तर चावतय
सोडल तर पळतय
सर्वांची झाली अवस्था अशी
