देवाच्या देवळात...
देवाच्या देवळात...
देवाच्या देवळात
नको नको ते पाप,
तिथे वाढते पोट
देव कसा त्या नरकात...
देवाच्या नावावर
घडे पाप सारं,
नको तो व्यवहार
किती व्याभिचार...
पुत्रप्राप्तीसाठी
आली सौंदर्यवती,
स्वाधीन पुजाऱ्यांस ती
नवस पूर्ण होती...
कित्येक इथे फसले
धंदाच उघड चाले,
उघडा जरा डोळे
महाराजच करी चाळे...
भोंदू महाराजामुळं
होई फार वाटोळं ,
पतीवृता ही पळं
होऊनी विटाळ...
