STORYMIRROR

angad darade

Tragedy Others

3  

angad darade

Tragedy Others

देवा

देवा

1 min
218

देवा कोपलं आभाळ

आम्हावरी कोपलं आभाळ


चांगला की वांगला हा 

कळनाय हेवं पावसाळा

कधी बरसल्या धारा 

तर कधी आल्या झळा 


दिवस दिवस ऊन कधी 

तर काही दिवस वांबाळ 

करपुन कधी नासुन कधी 

झाला सारा अवमेळ 


देवा कोपलं आभाळ 

आम्हावरी कोपलं आभाळ 


करुन दिन रात कष्ट तरी ही 

पिकांवर आली रोग राई 

उद्ध्वस्त केली मेहनत सारी 

कळणा झालंय देवा काई 


येऊन कधी जाऊन कधी 

झाला वेळोवेळी काळ 

देवा कोपलं आभाळ 

आम्हावरी कोपलं आभाळ


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy