देव
देव
देव म्हणजे देव म्हणजे देव असतो
काही झालं तरी स्वतःचच खरं करतो
सृष्टीचे नियमही तोच बनवतो
प्रत्येकाचं नशीबही तोच ठरवतो
फक्त मनुष्यच्या हाती कर्म देतो
आणि आपल्याला वाटत
आपणच सगळं करतो
कुणाला सुखाची ओंजळ देतो
तर कुणाला दुःखाची घागर देतो
फक्त देणं हा त्याचा नियम असतो
आणि तो मात्र देव कशोशीने पाळतो
हां.. ! कधी कधी तो सुद्धा
काहीतरी आपल्याकडे मागतो
निखळ भक्ती करा असं सांगतो
तुम्हांला हवं ते देतो असंही म्हणतो
पण देताना ह्याचे नियम हाच ठरवतो
आणि आपल्याला वाटत
आपण मागतो म्हणूनच हा देतो
इथं प्रत्येकाला वेगवेगळ्या रूपात तो भावतो
कुणाला आई वडील म्हणून समोर येतो
तर कुणाला मित्र शत्रू , गुरु म्हणून दिसतो
इथं प्रत्येकाशी तो जोडला असतो
तरी कोणालाही दिसतं नसतो
पण तरीही त्याचा मात्र अंश प्रत्येकात असतो
म्हणूनच मला वाटत
देव म्हणजे देव म्हणजे देव असतो
काही झालं तरी स्वतःचच खरं करतो
