STORYMIRROR

Sanika Patki

Others

3  

Sanika Patki

Others

पाऊस

पाऊस

1 min
223

अवखळ अल्लड कधी बागडत पाउस येतो

रिमझिम रिमझिम सप्त सुरांनी गाणे गातो

मना हवासा कधी येउनी धुंदच करतो

रिपरिप येता नकोनकोसा मनास करतो

सिहंगर्जने सह येऊनी तो कोसळतो

कधी प्रपाता सम येऊनी भिती दावतो

संततधारच पडता खाली धरणे भरतो

श्रावणात मग लपाछपीचा खेळच करतो

आभाळाला इंद्रधनूने कधी सजवतो

धरणीलाही मृदगंधाने तोच भुलवितो

नटण्या सजण्या अवनीलाही रंगच देतो

जीवन देण्या धरतीसाठी वरतुन येतो


Rate this content
Log in