थंडी
थंडी
1 min
289
दिसे धुक्याची दुलई
शहरानं ओढलेली
तेव्हा म्हणा जरा तुम्ही
थंडी आली थंडी आली
किती वर्णावा थंडीचा
थाट नवाबी नवाबी
सारे जग दिसे मात्र
आता शराबी शराबी
मग होई सारे जग
हिच्या गारव्याने धुंद
रविराज येतानाच
त्याची चाल करी मंद
पसरले नभी पहा
शरदाचं तारांगण
प्रेमपान्हा फुटे सर्वा
सृष्टी निघते न्हाऊन
येई गुलाबी थंडीत
हेमंतीची शिरशिर
होई बोचरीच जरा
येता थंडीला बहर
शिशिराची पानगळ
दाटे मना हुरहूर
ओढ लावूनिया जाते
पुन्हा येण्या लवकर
