विरामचिन्हे
विरामचिन्हे
1 min
194
कालच माझ्या स्वप्नात, सगळीच चिन्हे आली
मनीचे ते गुज, आता मलाच सांगू लागली
म्हणाली, कशाला अडकतेस आमच्यात
घेऊन आम्हाला निष्कारण, पडू नको वांद्यात
गुरूंनी काय सांगितले तेच ठेव ध्यानात
चिन्हे बाजूला ठेऊन, बसून बघ एकांतात
नको करू सुखदुःखाची बेरीज वजाबाकी
भावनेच्या संसारात शून्यच उरते बाकी
आनंदाला गुणायची वा दुःखाला भागायची
कागदावरची रीत ही, आहे फक्त बोलायची
स्वल्प अल्प विराम यांचा, नकोस धरू पाय
शांततेत बसून बघ, वेगळा नाही उपाय
देऊन बघ ना, सर्व नात्यांना पूर्णविराम
प्रतलांना दे सोडून, घेऊ नकोस विराम
आता नको तू अडकूस, भावनेच्या चिन्हांत
चिंन्हांशिवाय आनंद, द्विगुणित कर मनात
