रायगड
रायगड
1 min
284
रे हिंद बांधवा ऐक कान देऊन
करी रायगड हा राजांचे गुणगान
पाऊले त्यांची पडता डोईवरती
पावन मी झालो म्हणतो धन्य धन्य
कित्येक गुप्त मसलती मी पाही
कित्येक सोहळे या देहावरी होई
कित्येक पेच अन धक्के राजकारणाचे
साक्षीदार हा उभा रायगड होई
स्वाभिमान जो जागवे सर्वा हृदयी
ध्येयवाद जो रुजवी वाऱ्याकरवी
स्वधर्म बंधुता मिसळे या मातीत
कणाकणातच महाराष्ट्र धर्म जागवी
शूर धीर गंभीर उदार अन चतूर
ऐसा जाणता नृपवर मी पाही
काळचं जो कर्तृत्वाने बदलवी
ऐसा युगप्रवर्तक पुन्हा होणे नाही
सांगणे पुन्हा पुन्हा आता ते काय!
जाणते आहातच तुम्ही सर्व जण
जाऊ दे अंबरी त्यांच्या किर्तीचा ध्वज
अन् सांभाळा तुम्ही हो.. भगव्याचा हा मान
