STORYMIRROR

swapna borse

Inspirational

3  

swapna borse

Inspirational

देव माझा रायगडी

देव माझा रायगडी

1 min
207

सह्याद्री पर्वतावरी 

स्वर्ग जणू अवतरला,

उंच नभाशी करण्या स्पर्धा 

भगवा झेंडा उंचच उंच फडकला...! 


मेघराजही भरूनी आला 

आई शिवाईच्या भेटीला, 

तळ ठोकीला पावसाने 

आज सह्याद्री गहिवरला...!  


दवबिंदुनी इथे सजल्या

सह्याद्रीच्या कडा कडा,

डौलाने हा फडकतो 

पराक्रमी भगवा झेंडा...! 


गर्जुनी सह्याद्री सांगतो 

इतिहास हा स्वराज्याचा, 

त्रिखंडात गाजे ख्याती  

ऐसा राजा महाराष्ट्राचा...!


ताठ मानेने उभ्या

मज रांगा सह्याद्रीच्या

इथे उमटल्या पाऊलखुणा

शूरवीरांच्या शौर्याच्या...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational