STORYMIRROR

Goraksha Karanjkar

Tragedy

4  

Goraksha Karanjkar

Tragedy

देऊन गेलीस आयुष्य तुझे

देऊन गेलीस आयुष्य तुझे

1 min
286

 जाता जाता राहिलो मी

 हसता हसता गेलीस तू

  

 मनात माझ्या ठेवून ओझे

 देऊन गेलीस आयुष्य तुझे

  

होती गळ्यात तुळशीची माळ

कशी तुटेल ग आपली नाळ


मृदुंगाच्या ठेक्यावर डोलत होती तुझी मान

दोन्ही हातांचे करूनी टाळ धरत होतीस तू ताल


कधी नाही समजला तुला तुझा स्वार्थ

आयुष्य भर केलास तू नेहमीच परमार्थ


चेहऱ्यावरंच कळायचे तुला पाहुण्यांचे अंतर्मन

वाटे लावताना मिळायचे त्यांना पुढचे आमंत्रण


शेवटी शेवटी एकटीच होतीस तुझी तू

नाही कसला त्रास, नाही केलीस कसली इच्छा तू


जाता जाता राहिलो मी

 हसता हसता गेलीस तू

 

 मनात माझ्या ठेवून आझे

 देऊन गेलीस आयुष्य तुझे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy