STORYMIRROR

SANJAY SALVI

Inspirational

4  

SANJAY SALVI

Inspirational

देशाची पुकार !!

देशाची पुकार !!

1 min
300

शेतकरी राजा लावी त्याच्या गळ्याला लगाम,

कधी होणार माझा देश सुजलाम सुफलाम,

क्षिशण महर्षी सारे आंगठे बहाद्दर,

कसा होणार माझा देश संपूर्ण साक्षर,


नाही खेळाला मेदान अन पुरेशी साधन,

कधी कळणार या देशा ऑलिमपिकची   शान,

लोढ शेडींगहि आहे दिवसाचे तास सात,

कसा चालणार देश कोम्पूटरच्या युगात,


संरक्षण खात्यात कीड लागली चीलखताला ,

माझ्या देशाचा शिपाई उगा फुकाफुकी मेला,

असा कसा देश माझा झाला हो बेजार,

कधी काळी सोन्याचा आकाशात होता धूर,


जिथे तिथे पहा आहे भ्र्रष्टाचाराचा बाजार,

कुणीतरी ऐकेलका माझ्या देशाची पुकार !!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational