STORYMIRROR

Shital Yadav

Inspirational

3  

Shital Yadav

Inspirational

देश माझा

देश माझा

1 min
637


विविधतेत एकता असलेला देश माझा

एकतेत बंधुता असलेला देश माझा


साक्ष देत राहती इतिहासाचीच पाने

सैनिकात वीरता असलेला देश माझा


जन्म वाहिला नव्या भारत निर्माणसाठी

मानवी अखंडता असलेला देश माझा


रक्त सांडले किती वीरांचे जन्मभूवर

राजसी अजिंक्यता असलेला देश माझा


देशप्रेम ओतप्रोत भरूनी नखशिखांतच

बहुविधी विशालता असलेला देश माझा





साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational