देश आमचा महान
देश आमचा महान
जरी असे भारत हा
देश आमचा लहान,
तरीही तोच आहे
साऱ्या जगात महान
ज्ञान तंत्रज्ञान विकासात
आमचे ना कोठे अडे,
आमच्या देशाच्या प्रगतीचा
झेंडा सदैव जगात पुढे
देश असे आमचा
असा हा तरुणाईचा,
उंचावतो आलेख हा
सामाजिक आर्थिक परिस्थितीचा
येथे असे अशी नेहमीच
विज्ञानात ही गोडी,
जगाला टाकले मागे
करुनी प्रगती थोडी थोडी
उद्योग असो किंवा असो
ही कारखानदारी,
अन्न-धान्य उत्पादनात
आघाडीवर आमचा शेतकरी