डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
चहूदिशांनी नाद घुमतो
नमन करूयात क्रांतीसूर्याला ,
विश्ववंदनीय व्यक्तीमत्वास
नम्र अभिवादन महामानवाला.
दलितोद्धारक मानवता उपासक
डॉ.बाबासाहेब आंबेडकर,
तेजाची दमदार पावलं उमटवली
अघोरी काळाच्या वाटेवर....
अनमोल दागिना संविधान
भारतदेशास या त्याने दिला,
विद्वत्तेचा उपयोग महायोध्याने
समाजहितासाठी नित्य केला...
शिक्षणाचा मूलमंत्र कर्तृत्वाने
समाजास आदर्श निर्माण केला,
लेखणीच्या धारेतून परिवर्तन
प्रबुद्ध भारत त्याने साकारला...
अस्पृश्यांना चवदार ओंजळीचा
हक्क तो मिळवूनीया दिला,
मनुस्मृतीचे दहन करूनी
नवविचारांचा वारसा दिधला..
किती गावे गुणगान आणि
स्मरावे त्याच्या अगाध कार्याला,
विचारांना या आत्मसात करूनी
त्रिवार वंदन करू महामानवाला.
🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🌷
