Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

4.0  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (पोवाडा)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (पोवाडा)

1 min
172


धन्य, धन्य बाबासाहेब आंबेडकर 

क्रांतीसूर्य महामानव खरोखर 

मानवाचा करून जगी उद्धार 

देशाचे ठरले क्रांतीवीर -जी,जी जी 


महाराष्ट्र भूमीत जन्म घेऊन

मायमातीला लाभले रत्न 

नाव भीमराव ठेविले कुटूंबान 

रामजी यांना आनंद होऊन -जी ,जी जी 


लहानवयातच संघर्ष जीवनात 

शिक्षणाची जिद्द मनात 

गरीबीवर करून मात 

शिक्षणाची केली सुरुवात -जी,जी जी 


लहान वयात वाचनाची आवड 

उच्च शिक्षणाचे लागले वेड 

कायद्याचे शिक्षण अजोड 

भारतात खरी करून घडामोड -जी ,जी जी 


सभोवताली माणूसकी हीन जीवन 

त्यांचे ह्रदय गेले हेलावून 

माणसाला माणूस घ्यावे समजून 

त्यासाठी लढा उभारून -जी, जी जी 


चवदार तळ्याचा संघर्ष करून 

पाण्यासाठी न्याय दिला मिळवून 

अस्पृश्यतेचे करून निर्मूलन 

समानतेची देऊन शिकवण -जी,जी जी 


मानवतेची चळवळ उभारून 

बौद्ध धर्मात प्रवेश करून 

नागपूर येथे अनुयायी भिक्खू घेऊन 

धर्मांतर केले मानवाच्या कल्याणातून -जी ,जी जी 


इतिहासात ठेवून आठवण 

त्यांच्या कार्याचे झाले लेखन 

दरवर्षी 6डिसेंबर 14एप्रिल स्मरण 

चैत्यभूमी,नागपूर त्याची आठवण- जी, जी जी 


भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाला बळ 

पारतंत्र्याचा कठीण काळ 

मह्त्त्वाची त्यांच्या विचारांची वेळ 

स्वातंत्र्याला वाहिले बुद्धीबळ -जी, जी जी 


भारताचे महान लेखक थोर 

राज्यघटनेचे महान शिल्पकार 

कायद्याचे संविधानात रुपांतर 

जनतेला मिळाले हक्क खरोखर -जी,जी जी 


भारताने भारतरत्न पुरस्कार देऊन  

त्यांच्या कार्याचा गौरव करून 

शिका,संघटीत व्हा संघर्ष करा आचरण 

महामानव,क्रांतीसूर्य जगाला दर्शन -जी, जी जी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational