डोळ्यात पाणी
डोळ्यात पाणी
भांडलो एकमेकांशी
काही कारण नसतांना
हसलो एकमेकांसोबत
आनंद घेतांना!
डबा तुझा
खात होतो मी
तु हसत बघत
भूक भागवत होता माझी!
खिशात माझ्या
चार चिंचोके
भांडत माझ्याशी
खात होतास तू!
सुख सोयींचे
तुझे आयुष्य
मला सोबत
करण्यास विसरत असे!
आली ती निरोप घेण्याची वेळ
दहावीची परीक्षा झाली की
वेगवेगळे मार्ग आपुले
असणार नाही सोबत एकमेकांची!
निरोपाचा तो दिवस
डोळ्यात पाणी दोघांच्याही
तरी खोटे मोठमोठ्याने हसत
पुसत होतो डोळ्यातले पाणी एकमेकांचे!
देत होतो विश्वास एकमेकांना
शाळेतला हा निरोप संभारंभ फक्त
नाही आपल्या मैत्रीला निरोप
अशीच निखळ मैत्री जीवनात राहील सैदव!
