STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Tragedy

3  

गोविंद ठोंबरे

Tragedy

डोळे भरून आल्यावर...!

डोळे भरून आल्यावर...!

1 min
11.5K

एकदा डोळे भरून आले,

सीमेवरच्या जवानांसाठी....

मन दाटलं, उर पेटलं,

वाटलं काहीतरी करावं;शहीद झालेल्या वीरांसाठी...


फेसबुक काढलं,व्हाट्सअप्प उघडलं,

शहिदांचा डी.पी. ठेवण्यासाठी....

लाख लाख शिव्या घातल्या,

शत्रू देशवासीयांच्या कमेंट्सवरती....


अजून डोळे भरून आले,

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी....

मन दाटलं,उर पेटलं,

वाटलं काहीतरी करावं;होरपळलेल्या संसारासाठी....


थोपटला दंड,उचलला दगड

भिरकावला एका जमावावर....

काढला राग अन झालो शांत,

पांढऱ्या बगळ्यांच्या आश्वासनावर....


परत एकदा डोळे भरून आले,

बलात्कार झालेल्या अबलांसाठी....

मन दाटलं,उर पेटलं

वाटलं काहीतरी अजून करावं;माझ्या त्या भगिनींसाठी...


हळूच मग मेणबत्ती पेटवली,

माझ्या त्याच शिवाजी चौकावर....

काळ्या फिती बांधून परत निघालो,

वाट बघत असलेल्या उनाड कट्ट्यावर....


अजून तेच डोळे भरून आले,

दुष्काळग्रस्त झालेल्या मातीवर....

मन दाटलं,उर पेटलं

वाटलं काहीतरी अत्ताही करावं;दुष्काळजन्य भागावर...


घेतलं रोपटं,काढला सेल्फी

निवडून आलेल्या साहेबांच्या बायकोबरोबर....

केला अपलोड अन घेतल्या लाईक्स,

दरवर्षी खोदलेल्या त्याच खड्ड्यावर....


एकदा मात्र डोळे सुन्न झाले,

माझ्या स्वतःच्याच वागण्यावर....

मन गोठलं,उर फाटलं

वाटलं काहीतरी करावं;हतबल झालेल्या जगण्यावर....


उचलला पेन अन काढला कागद,

मी केलेल्या कृत्यावर...

सुचलं मात्र काहीच नाही,

निष्क्रीय झालेल्या माझ्या मनावर..निष्क्रीय झालेल्या माझ्या मनावर...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy