डिजिटल
डिजिटल
सायब आलं शाळंमंदी
म्हणलं-" शेल्फी घ्यायची
बाई पोरांची,
क्यामेरा हाय का?
म्हणले--
"कायपण काय सायब ,
बिना मोबाईलचं पोरगं न
बिना क्यामेऱ्याचा मोबायल कधी आसतो काय....?
आता सारं त डिजिटल झालं बगा ....
मोबायल,कॅमेरा,टेक्नोलाजी,घर,खेडी,गाव,शहर,राज्य,देश,विश्व......
सारं डिजिटल !
येवढंच काय ,
माणूस... मेंदू..मन...मनाचे आतले न भायेर चे व्यवहार....
नाती..रीतीभाती...सगे सोयरे..
पोरं ..न पोरांचे विचार
सारे डिजिटल ...!
जलम..जगणं- मरणं
हसणं.. बोलणं..लिव्हणं
वाचणं... नी वाचणं
सारं डिजिटल.
पण सायबजी,
माफी मांगते जरा बोलते,
नेमकं डिजिटल म्हंजी
काय हो ?
सापडल का यात कुठं
माणूस माणसाला
माणसासाठी माणुसकी
जपणारा....दावणारा...!
हाय का कुठं 'गुरुजी'
आन गुरुजी दिसताच
आदबीनं हुभा
र्हाणारा इद्यार्थी
बघा बरं ह्या
डिजिटल
जगात....?