STORYMIRROR

Anonymous None

Romance

3  

Anonymous None

Romance

दाट काळोख्या रात्री

दाट काळोख्या रात्री

1 min
26.9K


दाट काळोख्या रात्री

तुटावा तारा क्वचित

नजर पडावी त्यावर 

योगायोग जसा घडावा

तशी आयुष्यात आलीस तू.

पाण्याने व्याकुळ धरणी

यावी श्रावणधारा अवचित

ओलसर मायेने माती

तृप्ततृप्त अशी व्हावी

तशी आयुष्यात आलीस तू.

भयाने कासावीस लेकरू

गवसावी आई तितक्यात

प्रेमाच्या कुशीत तिच्या

जीवात जीव जसा यावा

तशी आयुष्यात आलीस तू.

विरहाने व्याकुळ मन

अश्रूंनी चिंबचिंब व्हावे

नजर कटाक्षाने सखीच्या

प्राणात प्राण भरावा

अगदी तशीच

आयुष्यात माझ्या आलीस तू.!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance