STORYMIRROR

Bal Zodage

Tragedy

3  

Bal Zodage

Tragedy

दारिद्र्याचा काळडोह

दारिद्र्याचा काळडोह

1 min
369

चुलीत काटकं थंडगार

अन् दिवाबी रिकामाच व्हुता

शेजारणीच्यातनं आणलेल्या इंगळांना

चुलीत घालून पॉट आतड्याला चिकटंपातूर

' फु s फु s ' करत फुकत व्हुती आय

अन् ती पार बेजार झाल्यावर

मग कुठं पिटली रडत करत


चुल जसजशी पेटत व्हुती ढणाढणा

तसतशी आमच्या पोटाची आग वाढत व्हुती कणाकणा !

अन् अशातच तात्या रिकामं आलं

आय हळहळतच कडाडली त्यांच्यावर,

'सोन्यासारखी लेकरं उपाशी..! 'पुढं तिला बोलवेना

नि हुंदक्यावर हुंदकं देत रडत व्हुती

अन् तव्यावर पडणारी तिची आसवं

तडतड करत जळत व्हुती अगतिकपणे !


त्या रात्री आमी घटाघटा घोट घितलं

रांजणातल्या गारगरवंद पाण्याचं

अन् आग इजवली पोटाची

भाकरीचं सपान बघत बघतच

त्या भयाण दारिद्र्याच्या काळडोहात !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy