दामिनी
दामिनी
माता सावित्री
शिक्षिका पहिल्या
महिलां जाणिल्या
ज्ञान पवित्री
माता रमाई
सावली भीमाची
माऊली जनांची
प्रेमळ आई
झाशीची राणी
शत्रूशी लढली
इंग्रजां नडली
पाजले पाणी
जिजाऊ माता
सांगे युद्धकथा
संपविण्या व्यथा
हिंदवी प्रांता
अंतराळात
कल्पना चावला
भारता भावला
मान जगात
तुझं मातृत्व
निसर्गाचं दान
वाटे अभिमान
श्रेष्ठ कर्तृत्व
महिलादिनी
प्रतिज्ञा करूया
आनंदी ठेवूया
साऱ्या दामिनी