वसंतोत्सव
वसंतोत्सव
1 min
251
शिशीरातला
भकास निसर्ग
मनमोही स्वर्ग
वसंतातला
फुटे पालवी
पानगळी झाडा
निसर्गाचा गाडा
मना भुलवी
चैत्राची चिता
अंगास चटके
शोधण्या भटके
सावली शीता
गोड स्वरात
गायी कोकिळा
धरा लावी टिळा
प्रातः काळात
आनंदास्तव
रोपटी लावूया
साजरा करुया
वसंतोत्सव
