थंडी
थंडी
1 min
244
थंडीत असे
गारव्याची मजा
उकाड्याची सजा
मुळीच नसे
सुंदर सृष्टी
हिरवळ सारी
सगळेच भारी
नाविन्य दृष्टी
हिवाळ्यात रे
दसरा, दिवाळी
तोषाची झळाळी
मुखी पाझरे
सुट्टी शाळेला
मुलांच्या गमती
खेळात रमती
गावजत्रेला
आरोग्यदायी
थंडीच असते
शरीर फुलते
व्यायामापायी
ऋतू हिवाळा
आल्हाददायक
ऋतूंचा नायक
स्वागता माळा
