चंद्रघंटा देवी
चंद्रघंटा देवी
चंद्रघंटा देवी माता
असे तिसरे ते रूप
भक्तगण आनंदती
काय वर्णावे स्वरूप
अर्धचंद्र आकाराचा
घंटा तो मस्तकावर
नाव चंद्रघंटा तिचे
मुद्रा युद्धास तयार
सिंहावर बसलेली
सोन्यापरी चमकते
दहा हात असलेली
दशभुजा म्हणवते
उपासक पराक्रमी
आणि निर्भय होतात
रूप ते अत्यंत सौम्य
भक्त गुण ते गातात
भक्तावरी तिची कृपा
चिंता कसलीच नसे
मना नियंत्रण ठेवी
आशीर्वाद तिचा असे
आवाजात मधुरता
देई देवी भक्तिभावे
पाप दूर होत असे
देवी मातेला स्मरावे
