चन्द्र नन्दन
चन्द्र नन्दन
क्षितिजा वरील सोनकिरणे
सोन पावलानी झळ झळती
गवाक्ष्या तुन सूटता वारे
धुंद मन्द क्षण लखलखती
हेमंतातील शीत गारवा
कुंद कुंद ज्योत पाझरती
परसा मधील वेलीवर का
चन्द्र चांदणे लख्ह ओघळ ती
सोन पावले धुक्यात उमटली
राधा राधा साद का ? उठली
सप्त सूरा च्या पलीकडले का
राधा अलगद बावरली !
काळ्या काळ्या धुंद लहरितून
कृष्ण कळा का सवारती
वेणु मधुनी सुर अलगद ते
गोधुल गोधन हम्बरती
