चिवुताईचं घरट
चिवुताईचं घरट
चिऊताईला बांधायचेय छोटेसे घरटे
फिर फिर फिरली चहुकडे नजर भिरभिरली.
हिरव्या गर्द झाडावरची दाट फांदी शोधली.
चिमण्यालाही ती भली आवडली
सुरू झाली धावपळ
दूरवर भटकून चिमणा व चिमणी,
काट्याकुटया दोऱ्या आणि वाळलेल्या गवतकाडयांची
जमवाजमव करू लागली.
इवल्याशा चोचीने घरटे बांधू लागले.
चोहोबाजूंनी काट्याकुट्या
मधोमध मऊ मऊ कापसाचा बिछाना.
इवलीईवली अंडी दिली चिमणीने
दोन मऊशार बिछान्यावर
पंखाखाली ठेऊन करू लागली
चिमणी जिवापाड राखण
एक दिवस अंड्याची हालचाल झाली
चिमुकली पिल बाहेर डोकावली.
पाहून त्यांना चिमणाचिमणी वेडावली.
आनंदाने भिरभरत अळ्या किडे दाणे शोधू लागली
पिलांच्या चोचीत हळूवार प्रेमाने भरवू लागले
दिवसामागून दिवस सरले, पिलांना पंख फुटले
आकाशात दूर दूर उडायचा हट्ट करू लागले
चिमणाचिमणी हिरमुसली तरीही पिलांना घेऊ दिली भरारी
दोन्ही पिल उंच दूर ऊडून गेली.
चिमणाचिमणी दोघेही पुन्हा
नव्या घरटयाच्या तयारीला लागली
