STORYMIRROR

SHASHIKANT SHANDILE

Abstract

4  

SHASHIKANT SHANDILE

Abstract

चिंतन...

चिंतन...

1 min
441

केविलवाणे रूप घेऊनि

फिरत राहिला अनवाणी

असे सोसले घाव ऋतूंचे

छेडत राहिला क्षणोक्षणी


थंड शहारा विना कापडी

झुंज कंटकी वाटेशी

रक्तरंजित अंगण सारा

उमेद नव्याने पाठीशी


नवे प्रयत्न नवीच आशा

आशेवरची नवीच प्रिती

अश्रूंनी भिजलेले डोळे

दरवेळी का नवीच नीति


अर्ध्यावरती झुंज सोडूनि

हार मानली बेचाऱ्याने

चूक आपली कुठे जाहली

विचार करावे का त्याने


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract